OPINIONMAKER

Thursday, September 8, 2011

खबरदार नाक खुपसाल तर....


नाना पाटेकर हे एक मनस्वी आणि कलंदर व्यक्तिमत्व आहे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता रोखठोक बोलणे ही त्यांची खासियत आहे. त्याचबरोबर मराठी असल्याचा रास्त अभिमान त्यांना आहे. त्यामुळेच मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी जमले तर एकत्र यावे, अशी सबुरीची भाषा त्यांनी वापरली होती. अर्थात यात कुणावरही टीका नव्हती, व्देष किंवा मत्सर नव्हता, की कुरघोडी करण्यासाठी केलेले ते राजकीय विधान नव्हते. सर्वसामान्य मराठी माणसाची ती इच्छा आहे,

Monday, September 5, 2011

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!


 परमेश्वराने  चराचर  व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना.....


सुधीर मुतालिक, अतिथी लेखक

Tuesday, June 7, 2011

भक्तगण संकटात, बाबा स्त्रीवेशात...

भ्रष्ट भारतीयांनी परदेशातील बँकांमध्ये ठेवलेला बेहिशोबी पैसा परत आणला पाहिजे या मुद्दाला देशातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. परंतु हे सगळे घडवून आणण्यासाठी काय केले पाहिजे याची मुद्देसूद मांडणी करुन ती प्रामाणिकपणे देशासमोर आणि सरकारसमोर ठेवण्याऐवजी रामदेवबाबांनी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी आणि महत्त्व वाढवण्यासाठी सगळ्या चाली रचल्या आणि त्या अंगलट आल्यावर पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.

Saturday, May 21, 2011

ढोंगीपणा आणि परिवर्तनाचा भाबडा आशावाद


 


                                                                                                                                 
ममता बॅनर्जी यांच्या इतकी धडाडी, जनतेच्या प्रश्नांवर मोठी आंदोलने उभी करुन आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहाण्याची ताकद, प्रलोभनांना बळी न पडता लढत राहण्याची तयारी महाराष्ट्रातील कोणत्या विरोधी नेत्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष विविध  महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर तडजोडी करुन त्याला तत्वाचा मुलामा देत असतात. कधीमधी पक्षासाठी नव्हे तर आपल्या वैयक्तिक संस्थांना मदत, अनुदान, परवानगी मिळावी म्हणून तर कधी आपल्या संस्थेची चौकशी होऊ नये, लांबणीवर पडावी म्हणून विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते सत्तेत असलेल्या नेत्यांशी सलगी करत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी जनतेसमोर असा पर्याय असेल तर शिवसेनाप्रमुखांचा आशावाद भाबडा ठरण्याची शक्यता जास्त आहे.

Saturday, April 23, 2011

कोई पत्थरसे ना मारो.......

जनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीचे सदस्य संतोष हेगडे सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय घेणार आहेत. हेगडे काय किंवा भूषण पितापुत्र आणि अण्णा हजारे काय, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार्‍या या बिनीच्या शिलेदारांबद्दल कुणीची काही बोलायचे नाही, असा बहुधा त्यांचा दंडक आहे. आम्ही धुतल्या तांदाळासारखे स्वच्छ आणि बाकी सगळे भ्रष्ट असा बहुतेक या मंडळींचा समज झालेला दिसतो.

Monday, March 28, 2011

ज्योतिषांचा सायकॉलॉजिकल गेम...ज्योतिषी नेहमी सायकॉलॉजिकल गेम खेळत असतात. समोरच्याला या गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो बेसवाध असतो. त्यामुळेच या गेममध्ये विजय नेहमी ज्योतिषांचा होतो. मात्र, पुण्यातील  एक ज्योतिषी मोठी शेखी मारायला गेले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकित केले. आता पुण्यातील ज्योतिषाने सांगितल्यावर भारताचा पराभव अटळ होता. परंतु युवराजसिंग आणि रैना यांना हे मान्य नव्हते. हे कसे काय घडले....

Sunday, March 27, 2011

संधी नावाचा साधू


 
 
 
 
 
सौजन्य ः http://archives.digitaltoday.in
 ------------------------------------------
संधी नावाचा साधू
हिंदुत्वाचा चेहरा असे किती साजिरा
नितीन म्हणतो बघ आहे किती गोल गोजिरा

पण लाल म्हणतो 'जिना' मजला प्रिय भारी
मग जसवंत ओढतसे सूर तोच भरजारी

उमा म्हणते उदार हा अटल दिसतो जरा
तोच आमुचा मुखवटा आहे खरा

मज वाटे किती ही गम्मत न्यारी
हिंदुत्व हे आपुले लई लई भारी

मग लाविला मुखवटा यांनी रामाचा मंदिरी
फसली भारतीय जनता भोळी बिचारी

पण आमुचा अरुण तो फार विचारी
सांगतसे गुप्तपणे गम्मत खरीखुरी

म्हणतो कसा आमुचे हिंदुत्व संधीसाधू
पण आता या रॉबर्ट ब्लेकला कैसे शोधू

हिंदुत्व ही तर आमुची जीवनशैली
विकिलिक्सने तिला ठरवली बदफैली

या लिक्सवर घाला लवकर बंदी
साधलेली आहे आपण आपली संधी
-सुहास यादव
------------------------------- 

Tuesday, March 8, 2011

त्या "यो" !

सुधीर मुतालिक  (अतिथी लेखक) 

      काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला  होणारा फायदा याचा  विचार करून, ती यादी मला आधी कळवुन  वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होते. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर ट्रेनिंग रूम मध्ये पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती , दिपवून  टाकणारी!  माफक आणि निमंत्रितच लोकांना बसायला जागा. भराभर मी bag टेबल वर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम " यो " दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धIडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला -

Sunday, February 20, 2011

श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय?

- मयुरेश कुलकर्णी  (अतिथी लेखक)

तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मी या एका प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडणार आहे. शेवटी या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्यावरचा निर्णय हे तुमच्याच हातात आहे.
आपण 'श्रीमंत मरायची' बाजू आधी बघुयात. 'श्रीमंत मरायचं' या विचाराची सुरुवात माझ्या डोक्यात एका घटनेमुळे झाली.....

Sunday, February 13, 2011

पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी

नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरचित्रवाणी वृ्त्त वाहिन्यांच्या पत्रकारितेबाबत काही विधाने केल्यानंतर  पत्रकारांनी त्यांच्यावर  बहिष्काराचे अस्त्र उपसले. अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार या अस्त्राकडे ढुंकनही पाहिले नाही. आपण काहीच चुकीचे बोललेलो नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ते त्यावर ठाम राहिले.  त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी * अटी लागू अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकर पुढार्‍यांनी तातडीने अजित पवार यांच्यावरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करुन टाकले आणि या प्रकरणातून एक प्रकारे स्वतःची सुटका करुन घेतली.  मूळ मुद्दा आहे तो हे सगळे कशामुळे घडले. सध्याची पत्रकारिता आणि पत्रकारांना नोकरी म्हणून  काय गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि अजित पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते?

Wednesday, January 26, 2011

हौतात्म्य


सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकातील जनतेच्या हिताचे रक्षण करताना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या लढ्यातील. आता त्या  पंक्तीत  सोनवणे यांनी  स्थान मिळवले आहे. आमच निर्ढावलेलेल राजकारणी अशा किती जणांना हौतात्म्य पत्करायला लावणार आहेत, माहिती  नाही.
-------------------------------------

  एकीकडे 'आदर्श' गैरव्यवहार करणारे नेते आणि आयएएस अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत. सुभाष लाला आणि रामानंद  तिवारी यांच्या सारखे निगरगट्ट अधिकारी तर बेडरपणे समाजाचा पैसा लुटून राजीनामा द्यायला नकार देण्याची हिंमत दाखवू शकतात आणि दुसरीकडे सोनवणेंसारख्या प्रामाणिक अधिकार्‍याला
आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे.

माणूस श्रेष्ठ


आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्‍न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्‍वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्‍न आहे.
----
गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्‍न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?