
sudhirmutalik@gmail.com
---------------------------------
स्वातंत्र्य ही सुसंस्कृत समाजाची गरज आहे. स्वातंत्र्य ही विकासाची पहिली अट आहे. स्वातंत्र्य आहे; पण ते विशिष्ट गटापुरते, विशिष्ट लिंगापुरते मर्यादित आहे. ही सुसंस्कृत समाजाची लक्षणे नव्हेत किंबहुना मर्यादितांना स्वातंत्र्य देणारा समाज अघोरीच म्हटला पाहिजे. अशा अघोरी, अमानवी समाजाला हआपण तालिबानी संबोधतो. पबमध्ये पुरुषांनी गेलेले चालते; पण स्त्रियांनी जाण्याने संस्कृती भ्रष्ट होते, हा कसला माज आहे? पुरुषांना पबमध्ये बसून गप्पा मारण्याची, मद्य चाखण्याची इच्छा होऊ शकते तर कोणत्या Biological कारणामुळे स्त्रियांना तसा मोह होऊ शकत नाही? ज्या मुलींना वयाच्या 18 वर्षानंतर सज्ञान म्हणवून घेण्याचा आणि मतदानाचा घटनेने अधिकार दिला आहे, त्यांना अनधिकृत नसणाऱ्या ठिकाणी जायला मकरणारे हे बाजीराव कोण आणि ते स्वतकाय समजतात?