OPINIONMAKER

Monday, April 28, 2014

सत्तेसाठी बेभान

जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान आपण बाळगत असताना या लोकशाहीत सत्तेसाठी बेताल आणि बेभान विधाने करणारे नेते बघितले की आपलीच मान शरमेने खाली जाते. याचा इलाज मतदारांच्याच हाती आहेत. लोकशाही प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेत अशा प्रवृत्ती संपून जातील असा आशावाद आपली व्यवस्था आणखी बळकट करेल.

मतदानाचा प्रारंभ ईशान्येकडून


यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने प्रथमच ईशान्येकडील 25 जागांवरील लढती गांभीर्याने घेतल्या आहेत. आसाममधील आसाम गण परिषेदशी युती न करता त्यांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन तो पक्ष कमकुवत करण्याची चाल खेळली आहे. ताकद कमी असलेल्या राज्यांमध्ये स्थानिक गटांच्या उमेदवारांना पाठिंब्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. विविध जाती-जमाती आणि ख्रिस्ती नागरिकांचा प्रभाव असलेल्या या भागात मोदींची कथित लाट किती प्रभावी ठरणार यावरच भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.