
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे सहा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबरदस्त ताकद असल्याचे सांगितले जाते. या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था, साखर कारखाने हे सगळे लक्षात घेतले तर पक्षाचे या भागात निर्विवाद वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. या पाच जिल्ह्यातील बारापैकी कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, कऱ्हाड, बारामती, नगर (दक्षिण) येथून मागील वेळी पक्षाचे खासदार निवडून आले होते. त्याखेरीज पंढरपूर (राखीव) मतदारसंघातून पक्षाच्या पाठिंब्यावर रामदास आठवले निवडून आले होते. उर्वरीत चार जागांपैकी दोन कॉंग्रेसला (सांगली व पुणे) आणि प्रत्येकी एक भारतीय जनता पक्षा (सोलापूर) व शिवसेनेला (खेड, जि. पुणे) मिळाली होती.
पंजा, घड्याळ कशाला? कोंबडाही चालेल...