OPINIONMAKER

Saturday, September 20, 2014

कोण लढले, कोणासाठी?


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा गेल्या आठवड्यात मुंबई दौरा झाला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना एक नाजूक प्रश्न विचारला. अर्थात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनातही हा प्रश्न रेंगाळतो आहेच. आता राष्ट्रीय अध्यक्षांनीच या प्रश्नाला हात घातल्यावर राज्यातील नेत्यांचा बेरकीपणा उघड झाला आहे. 

Thursday, August 7, 2014

निर्भया आणि नितीन

धर्माच्या नावाखाली समाजातील मोठ्या वर्गाला गुलामगिरीत ठेवल्यानंतर आता देश स्वतंत्र झाल्यावरही या वर्गाला समाज म्हणून आपण छातीशी कवटाळू शकलो नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्यांना जवळ घेण्याचे सोडा, त्यांच्यावर अत्याचार झाल्यावर आपण न्यायदेखील देऊ शकत नाही ही मोठी दुर्दैवी स्थिती आहे.

आऊटसायडर दिल्लीत

देशातील कोट्यावधी जनतेच्या आशा-आकांक्षांशी काहीही देणेघेणे नसलेल्या ल्यूटन्स संस्कृतीच्या आहारी गेलेल्या राज्यकर्त्यांनी सत्तेव्दारे मिळणाऱ्या सगळ्या सोयी-सुविधा आणि फायदे लाटले. सत्तेवर कुणीही येवो ही संस्कृती कायम प्रभाव गाजवत राहिली. आता नरेंद्र मोदी यांच्या रुपाने प्रथमच एका आऊटसायडरने दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला आहे. स्पष्ट जनादेश घेऊन आलेल्या या नेत्याने आता ही ल्यूटन्स संस्कृती पूर्णपणे मोडीत काढावी अशी जनतेची अपेक्षा आहे.

Wednesday, August 6, 2014

भविष्यवेत्ते, जनमत चाचण्या तोंडघशी


मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष म्हणजे शितावरून भाताची परिक्षा असा प्रकार असतो. पण भात करताना तांदूळ एकाच जातीचा असतो, त्याला मिळणारी उर्जा, वाफ एकसारखी असते. त्यामुळे भाताची परिक्षा करता येते. पण भारतासारख्या विविध जाती, धर्म, भाषा, संस्कृती अशी बहुविधता आणि प्रश्नांचीदेखील तशीच बहुविधता असेलल्या देशात सर्वेक्षणातून मतदानाच्या निकालाचे अंदाज वर्तवणे ही मोठीच जोखिम असते.

Sunday, June 1, 2014

संघर्षशील कार्यकर्ता


मुंबईतील गिरणीत किटलीबॉय म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाचा महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. त्यावेळी परिषदेचे आधारस्तंभ असलेल्या प्रा. यशवंतराव केळकर यांचा परिस स्पर्श त्या मुलाच्या आयुष्याला झाला आणि त्याचे सगळे आयुष्यच बदलून गेले. चाळीतील खोलीत राहणाऱ्या कुटुंबाला सुखी करण्यापेक्षा समाजजीवन सुखी करण्याचा निर्णय घेऊन चंद्रकांतदादा पाटील नावाचा झंझावात कोणाताही मोबदला न घेता विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी निघाला.  

Monday, April 28, 2014

सत्तेसाठी बेभान

जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान आपण बाळगत असताना या लोकशाहीत सत्तेसाठी बेताल आणि बेभान विधाने करणारे नेते बघितले की आपलीच मान शरमेने खाली जाते. याचा इलाज मतदारांच्याच हाती आहेत. लोकशाही प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेत अशा प्रवृत्ती संपून जातील असा आशावाद आपली व्यवस्था आणखी बळकट करेल.

मतदानाचा प्रारंभ ईशान्येकडून


यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने प्रथमच ईशान्येकडील 25 जागांवरील लढती गांभीर्याने घेतल्या आहेत. आसाममधील आसाम गण परिषेदशी युती न करता त्यांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन तो पक्ष कमकुवत करण्याची चाल खेळली आहे. ताकद कमी असलेल्या राज्यांमध्ये स्थानिक गटांच्या उमेदवारांना पाठिंब्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. विविध जाती-जमाती आणि ख्रिस्ती नागरिकांचा प्रभाव असलेल्या या भागात मोदींची कथित लाट किती प्रभावी ठरणार यावरच भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.

Wednesday, April 2, 2014

अखेर टाईपरायटर म्युझियममध्ये


शासकीय व्यवस्थेत अमुक गोष्ट अशीच का केली जाते हे विचारण्याचे धाडस कुणी करत नाही. त्यामुळे जगामध्ये परिवर्तन होत असले तरी शासन व्यवस्थेत त्याचे वारे वाहायला अनेक दशके जावी लागतात. टायपिंग मशिनचे असेच आहे. आता बहुतेक शासकीय कार्यालयांमधून टाईपरायटर हद्दपार झाले असले तरी राज्यील टाईपरायटिंग इन्स्टिट्यूना सांगण्यासाठी 2014 साल उजाडावे लागले.