ज्योतिषी नेहमी सायकॉलॉजिकल गेम खेळत असतात. समोरच्याला या गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो बेसवाध असतो. त्यामुळेच या गेममध्ये विजय नेहमी ज्योतिषांचा होतो. मात्र, पुण्यातील एक ज्योतिषी मोठी शेखी मारायला गेले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकित केले. आता पुण्यातील ज्योतिषाने सांगितल्यावर भारताचा पराभव अटळ होता. परंतु युवराजसिंग आणि रैना यांना हे मान्य नव्हते. हे कसे काय घडले....
Don't let the sadness of your past and the fear of your future, run the happiness of your present.
Monday, March 28, 2011
ज्योतिषांचा सायकॉलॉजिकल गेम...
ज्योतिषी नेहमी सायकॉलॉजिकल गेम खेळत असतात. समोरच्याला या गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो बेसवाध असतो. त्यामुळेच या गेममध्ये विजय नेहमी ज्योतिषांचा होतो. मात्र, पुण्यातील एक ज्योतिषी मोठी शेखी मारायला गेले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकित केले. आता पुण्यातील ज्योतिषाने सांगितल्यावर भारताचा पराभव अटळ होता. परंतु युवराजसिंग आणि रैना यांना हे मान्य नव्हते. हे कसे काय घडले....
Sunday, March 27, 2011
संधी नावाचा साधू

सौजन्य ः http://archives.digitaltoday.in
------------------------------------------
संधी नावाचा साधू
हिंदुत्वाचा चेहरा असे किती साजिरा
नितीन म्हणतो बघ आहे किती गोल गोजिरा
पण लाल म्हणतो 'जिना' मजला प्रिय भारी
मग जसवंत ओढतसे सूर तोच भरजारी
उमा म्हणते उदार हा अटल दिसतो जरा
तोच आमुचा मुखवटा आहे खरा
मज वाटे किती ही गम्मत न्यारी
हिंदुत्व हे आपुले लई लई भारी
मग लाविला मुखवटा यांनी रामाचा मंदिरी
फसली भारतीय जनता भोळी बिचारी
पण आमुचा अरुण तो फार विचारी
सांगतसे गुप्तपणे गम्मत खरीखुरी
म्हणतो कसा आमुचे हिंदुत्व संधीसाधू
पण आता या रॉबर्ट ब्लेकला कैसे शोधू
हिंदुत्व ही तर आमुची जीवनशैली
विकिलिक्सने तिला ठरवली बदफैली
या लिक्सवर घाला लवकर बंदी
साधलेली आहे आपण आपली संधी
-सुहास यादव
-------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)