ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आलेली होती. माझ्या भावंडाचे शिक्षण होऊ देत, मला जर नीट सेटल होऊ देत मग भ्रष्टाचाराविरुद्ध लढू, असे त्यांना कधी वाटले नाही. मनात आणले असते तर त्याच यंत्रणेचा भाग होऊन त्यांना त्यांचा वाटा मिळत राहिला असता. त्यांनी वाट्याचा विचारही केला नाही. भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी प्राणाची किंमत मोजली. असा आवाज उठवणाऱ्यांना... विशेष संरक्षण देण्यासाठी कायदा तातडीने कायदा करण्याची गरज आहे.