
चार आण्याचे, आठ आण्याचे आणि बारा आण्याचे कार्यकर्ते अशी वर्गवारी झाल्यामुळे शाखाप्रमुखांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख कार्यसल्लागार (क्रमांक 1) संजयजी राऊत यांनीच शिवसेनेच्या खासदाराला चार आण्याची किंमत नसल्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली होती. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी चिल्लर आणि बंदा रुपया यातील फरक उदाहरणासह स्पष्ट केल्याने गोंधळात भर पडली होती.