
------
परमेश्वराला रिटायर करावे, असे डॉ। श्रीराम लागू यांचे मत आहे। अधूनमधून ते त्यावर बोलत असतात। ते बोलले की लगेचच त्यांचे विचार मान्य नसणारे आक्रमकपणे आपली बाजू मांडू लागतात। त्यातून काही प्रमाणात वैचारिक घुसळण होते। डॉ। लागू यांचे म्हणणे क्षणभर बाजूला ठेवले तरी आपले देव, समाज, धर्म आणि भाविकता याबाबत मुळातून विचार करण्याची आपली तयारी आहे का? दुसरी गोष्ट म्हमजे देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली आणि लोकांवर मोहिनी टाकणाऱ्या बुवा, बापू, महाराज, शास्त्री यांचा भूतकाळ काय आहे, ते नेमके समाजासाठी काय करतात, सामाजिक सुधारणा, आरोग्य, शिक्षण याबाबत यांच्या भूमिका काय आहेत हे या निमित्ताने तपासण्याची गरज आहे।