OPINIONMAKER

Monday, February 16, 2009

पब, महिला आणि संस्कृती


सुधीर मुतालिक, नाशिक (अतिथी लेखक)
sudhirmutalik@gmail.com
---------------------------------
स्वातंत्र्य ही सुसंस्कृत समाजाची गरज आहे. स्वातंत्र्य ही विकासाची पहिली अट आहे. स्वातंत्र्य आहे; पण ते विशिष्ट गटापुरते, विशिष्ट लिंगापुरते मर्यादित आहे. ही सुसंस्कृत समाजाची लक्षणे नव्हेत किंबहुना मर्यादितांना स्वातंत्र्य देणारा समाज अघोरीच म्हटला पाहिजे. अशा अघोरी, अमानवी समाजाला हआपण तालिबानी संबोधतो. पबमध्ये पुरुषांनी गेलेले चालते; पण स्त्रियांनी जाण्याने संस्कृती भ्रष्ट होते, हा कसला माज आहे? पुरुषांना पबमध्ये बसून गप्पा मारण्याची, मद्य चाखण्याची इच्छा होऊ शकते तर कोणत्या Biological कारणामुळे स्त्रियांना तसा मोह होऊ शकत नाही? ज्या मुलींना वयाच्या 18 वर्षानंतर सज्ञान म्हणवून घेण्याचा आणि मतदानाचा घटनेने अधिकार दिला आहे, त्यांना अनधिकृत नसणाऱ्या ठिकाणी जायला मकरणारे हे बाजीराव कोण आणि ते स्वतकाय समजतात?

कोणत्या संस्कृतीच्या गप्पा हे मारत आहेत? ती संस्कृती म्हणजे नेमके काय? ती कुठे लिहून ठेवली आहे? कुणी लिहिली आहे? ती ही अपौरुषेय आहे का? भारतात ती कुठे कुठे शिकवली जाते? तिला प्रजासत्ताक भारतीय घटनेची मान्यता आहे का? स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळे स्वातंत्र्य देणारी ही संस्कृती पाशवी नाही का? तालिबानी याच्यापेक्षा वेगळे काय करतात?

संस्कृती रक्षणाच्या गप्पा हा Arrogance of inferiority आहे. तथाकथित संस्कृती रक्षकांना वर्तमानाची एक अज्ञात भीती आहे किंवा "खतरे में है' सारखा बागुलबुवा उभा करून स्वतपोळी भाजून घ्यायची असते. सतत इतिहासाची दारू पाजून झिंगणाऱ्या टोळ्या तयार करून जगण्यात या मंडळींना निर्धास्त वाटते. अशा टोळ्या स्वतआणि बऱ्याच अंशी समाजाचे वर्तमान तर नासवतातच; पण भविष्यही बेचिराख करायला निघतात हे जळजळीत सत्य आहे आणि दुर्दैव आहे.

कर्नाटकातल्या हुक्केरीच्या मुतालिकांच्या श्रीराम सेनेच्या सैनिकांनी संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मंगळूरच्या पबमध्ये बसलेल्या मुलींवर केवळ त्या मुली आहेत आणि पबमध्ये बसल्या आहेत म्हणून त्यांच्यावर हकरणे, त्यांच्या पॅंट खाली सरकवकणे हे अमानूष आहे, अमानवी आहे, क्रूर आहे. हाच तो inferiority चा Arrogance !


स्त्रियांवर हात टाकणाऱ्याचे हात कलम

मुलगी म्हणून जन्माला येणे हे त्या मुलींच्या हातात नव्हते. मुलगी म्हणून जन्माला आले याचा तिला अभिमानही असेल आणि का नसावा? मुलगी म्हणून जन्माला येताना तिने कोणते कपडे घालावेत, कुठे जावे, कुठे जाऊ नये, कुणाबरोबर बोलावे या विषयीची काही बंधने चिकटवली आहेत का, ती मुलांना चिकटवली नाहीत? पुरुषांना अशा बंधनांच्या बाबतीत concession असते का? खरंच संस्कृती रक्षणाची धमक असेल तर समाजाला पोषक असणाऱ्या आणि नसणाऱ्या गोष्टींची जाणीव करून द्या. त्यातले काय करायचे आणि काय नाही हे लोकांना ठरवू द्या. समाजाचा काही भाग कांदा, लसूणही निषिद्ध मानतो, तर काही जणांचा मांसाहार हेच दैनंदिन जीवन असेल. त्या त्या व्यक्तीचा, कुटुंबाचा किंवा गटाचा तो Choice
आहे. त्यांच्या निवडीमध्ये जर प्रजासत्ताक लोकशाही घटनेला काही अमान्य नसेल तर संस्कृतीचा प्रश्‍न येतोच कुठे? ही संस्कृती एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा मुतालिकासारखा रक्षक ठरवत असेल तर ती आम जनतेने मान्य का करावी? ज्यांना संस्कृती "खतरे मे है'ची आरोळी ठोकून पबमध्ये जाणाऱ्या मुलीवर हकरावेसे वाटते त्यांनी नाशिकच्या आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी भागात एखादी चक्कर मारली तरी दिसेल, की पुरुषांबरोबर आदिवासी स्त्रियादेखील दिवसाढवळ्या दारू ढोसून तर्र असतात. चाणक्‍य सीरियलमध्ये पब बघितलेच असतील. इतिहास सांगतो त्याही वेळेला मदिरालये होती. चंद्रगुप्ताच्या कालावधीत मदिरालये होती. मदिरालये हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे किंवा नाही हा वादाचा विषय होऊ शकतो; पण स्त्रियांवर हात टाकणाऱ्याचे हात कलम करण्याची, अशा नराधमाचा कडेलोट करण्याची मात्र आमची संस्कृती आहे हे शिवरायांसारख्या महान नेत्यांनी नक्की सांगितले आहे.

पब हवा की नको हे कायदा ठरवेल, भारतीय घटना ठरवेल आणि कायदा लोकांचे प्रतिनिधी ठरवतील. पब नको असेल तर कायद्याने बंद करा. आर. आर. ऊर्फ आबा पाटलांनी डान्स बार नाही कायद्याने बंद केले? समाजाने त्याचे भरभरून स्वागतच केले. कायद्याने अशा गोष्टी करायला लोकप्रतिनिधीत्व मिळवण्याची आणि ते टिकवण्याची धमक लागते. ती नसते या inferiority पोटी तथाकथित रक्षेचा arrogance निर्माण होतो. संस्कृती हा काही मानदंड नव्हे. ती एखाद्या व्यक्तीची, गटाची जगण्याची पद्धती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासाची कास धरणारी, उद्धाराला कारणीभूत ठरणारी, उन्नतीचे निमित्त ठरणारी सर्वांसाठीची सोय आहे. जिथे संस्कृती प्रवाही नाही त्या व्यक्ती, तो समूह विकासाअभावी, अज्ञानाच्या आर्थिक मागासलेपणाच्या दलदलीत खितपत पडलेला आपण उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. त्यामुळे संस्कृती हा मानदंड म्हणून केवळ अमान्य आहे. काळाबरोबर ती प्रवाहीच असली पाहिजे.


शंभर वर्षांपूर्वीचे नियम आजच्या जगण्याला लावणे यालाच तालिबानी वृत्ती म्हणतात. शेकडो वर्षांपूर्वी आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी इथल्या स्त्रीभोवती काही संरक्षक कवचे उभी केली असतील. आक्रमकांचा नेम अन्य लूटमारीबरोबर इथल्या स्त्रिया पळवून नेण्याकडे, त्या भ्रष्ट करण्याचा असायचा हा इतिहास नव्याने इथे नमूद करावयाची आवश्‍यकता नाही. त्यामुळे स्त्रियांवर वावरण्यामध्ये, वागण्यामध्ये बंधने आली असतील; पण काळाच्या ओघात परिस्थिती अनुकूल असताना त्या आचारसंहितेमध्ये आवश्‍यक ते बदल करताना केली जाणारी ओरड अमानवी म्हटली पाहिजे. म. फुले आणि सावित्रीबाईंनी तत्कालीन तालिबान्यांचा रोष पत्करून, प्रसंगी आपल्या कौटुंबिक सुखाची होळी करून मुलींच्या हातात पाटी-पेन्सिल दिली आणि आज मुलींनी शिकले पाहिजे ही संस्कृती बनली. शाळेत मुलींना नेताना हझालेच. संस्कृती भ्रष्ट होत असल्याची ओरड केली गेलीच. पोषाख हे संस्कृतीचे प्रतीक मानताना नऊवारी जाऊन पाचवारी येताना रक्षकांनी असाच धिंगाणा गातला असेल; पण कालांतराने पाचवारी ही संस्कृती बनली. 70-80 च्या दशकात पाचवारीची फॅशन ओसरून वेगवेगळ्या ड्रेसची फॅशन येताना ऱ्हासाची तक्रार होतीच.


पोषाखाच्या स्थित्यंतराचा मुद्दाम उकरावयाचे कारण असे, की संस्कृतीची संकल्पना प्रवाही असते. सोयीनुसार, आवडीनुसार बदलत असते. खाद्य, वास्तू वा अन्य आणखी संस्कृतीची प्रतीकेसुद्धा अशीच प्रवाही असतात. बदलत असतात. काळ हा त्या बदलण्याचा संदर्भ असतो. या बदलांची सुरवात एखादा फतवा नसतो. बदलाची सुरवात किंवा गरज व्यक्तीची किंवा एखाद्या गटाची choice असते.

लोकशाहीच्या चौकटीतले सनदशीर व्यक्तिस्वातंत्र्य ही भारतीय समाजाची संस्कृती आहे. हे स्वातंत्र्य चिरडणे हा संस्कृतीवर हआहे. युनिफॉर्म जगणे, युनिफॉर्म खाणे, युनिफॉर्म पांघरणे, युनिफॉर्म बोलणे या समाजाने कधीच मान्य केले नाही. सगळे काही जागोजागी वेगळे वेगळे. हे हजारो वर्षे या मातीचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचमुळे सुमारे तीन हजार वर्षांच्या विविध आक्रमणानंतरसुद्धा या मातीची भारतीयता कधीच लोप पावली नाही; नव्हे ती आज जोरदार फुलली आहे. एकसारखे जिथे तोडून नष्ट करण्यासारखे काही नव्हते किंवा नाही तिथे इमारती पाडण्याने, शिल्पे नष्ट करण्याने, पेहेरावांवर सक्ती केल्याने भारतीयत्व किंवा संस्कृती लोप पावण्याची शनाही. गरिबीत, गुलामगिरीत इथल्या व्यक्तींनी अनेक जुलूम सहन करूनसुद्धा या मातीला आपले म्हटले आणि बेहद्द प्रेम केले ही आमची संस्कृती आहे. माणूस जिथे नुसता राहूनसुद्धा जगू शकत नाही अशा सियाचीनसारख्या प्रदेशात 20-25 वर्षांची पोरं लढू कशी शकतात या शंकेचे निरसन आपल्या संस्कृती वैशिष्ट्यामध्ये आहे. त्यामुळे खरेतर बहुरंगी, बहुढंगी राजकारणी टोळ्यांना हे आता तरी समजायला पाहिजे, की गेली अडीच हजार वर्षे या सगळ्यांच्या कित्येक पट अजस्र आणि भीषण ताकदवान अशा अलेंडर, शक, हूण, कुशाण, मोगल, ब्रिटिश वगैरे डोळ्यांनी या संस्कृतीला नष्ट करायला किंवा तिचा रंग कायमचा बदलण्यासाठी वाटेल ते केले तरीही ती टिकली. जगातल्या कितीतरी देशांचे रंग अशा रेट्यामुळे बदललेसुद्धा! उदाहरणार्थ काही देश आक्रमणानंतर इस्लामी झाले; पण अशा रेट्यामुळे भारतीय संस्कृती टिकून राहिली, फोफावली आणि आजची तिची प्रगती तर देदीप्यमान यशाच्या वाटेवर आहे. त्यामुळे कुणी जीन्स घातली किंवा शेंडी ठेवली नाही तर संस्कृती बुडाली असे मानण्याचा inferiority complex बाळगण्याचे काहीच कारण नाही. घाबरून तथाकथित रक्षक पारा पकडायचा पकडायचा करतात आणि अपयशाने व्यथित होऊन हकरतात. प्रत्येक व्यक्ती हीच इथे संस्कृती आहे, तेव्हा व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून योग्य अयोग्य ते काय याच्या चर्चा घडवून पोषक बदल घडविणे म्हणजे संस्कृतीचे रक्षण करणे आहे.

-
(लेखक प्रतिथयश उद्योजक असून कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थीदशेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते.)

-----------------

No comments: