यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने प्रथमच ईशान्येकडील 25 जागांवरील लढती गांभीर्याने घेतल्या आहेत. आसाममधील आसाम गण परिषेदशी युती न करता त्यांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन तो पक्ष कमकुवत करण्याची चाल खेळली आहे. ताकद कमी असलेल्या राज्यांमध्ये स्थानिक गटांच्या उमेदवारांना पाठिंब्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. विविध जाती-जमाती आणि ख्रिस्ती नागरिकांचा प्रभाव असलेल्या या भागात मोदींची कथित लाट किती प्रभावी ठरणार यावरच भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
Don't let the sadness of your past and the fear of your future, run the happiness of your present.
Monday, April 28, 2014
मतदानाचा प्रारंभ ईशान्येकडून
यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने प्रथमच ईशान्येकडील 25 जागांवरील लढती गांभीर्याने घेतल्या आहेत. आसाममधील आसाम गण परिषेदशी युती न करता त्यांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन तो पक्ष कमकुवत करण्याची चाल खेळली आहे. ताकद कमी असलेल्या राज्यांमध्ये स्थानिक गटांच्या उमेदवारांना पाठिंब्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. विविध जाती-जमाती आणि ख्रिस्ती नागरिकांचा प्रभाव असलेल्या या भागात मोदींची कथित लाट किती प्रभावी ठरणार यावरच भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
Wednesday, April 2, 2014
अखेर टाईपरायटर म्युझियममध्ये
शासकीय व्यवस्थेत
अमुक गोष्ट अशीच का केली जाते हे विचारण्याचे धाडस कुणी करत नाही. त्यामुळे
जगामध्ये परिवर्तन होत असले तरी शासन व्यवस्थेत त्याचे वारे वाहायला अनेक दशके
जावी लागतात. टायपिंग मशिनचे असेच आहे. आता बहुतेक शासकीय कार्यालयांमधून
टाईपरायटर हद्दपार झाले असले तरी राज्यील टाईपरायटिंग इन्स्टिट्यूना सांगण्यासाठी
2014 साल उजाडावे लागले.
Tuesday, May 22, 2012
डॉ. आंबेडकर आणि लबाडांचा कांगावा
एनसीईआरटीने बनवलेल्या पुस्तकातातील वादग्रस्त व्यंगचित्रात बाजूला शेकडो लोक उभे असल्याचे दाखवले आहे. त्याचपद्धतीने गोगलगायीवर सात-आठ लोक बसल्याचे दाखवता आले असते. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीला दिरंगाई होण्यास सगळी घटना समिती जबाबदार आहे, असे म्हटता आले असते. ती गोगलगाय म्हणजे
`घटना समिती' अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला. पण बारकाईने पाहिले तर गोगलगायीवर constitution असे लिहिलेले दिसते. त्याठिकाणी
`घटना समिती' असे लिहिलेले नाही. त्यामुळे घटना तयार करण्यास उशीर झाला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आणि देशाला एक उत्तम घटना दिली की त्याचे श्रेय सगळ्या घटना समितीला द्यायचे, अशी लबाड मांडणी करणारा आणि तसा प्रचार करणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. आपले हितसंबंध आणि जातीवर आधारित श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी धूर्तपणे युक्तिवाद करुन दिशाभूल करणाऱ्या या वर्गाला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.Sunday, January 22, 2012
चार आण्याची कोंबडी आणि कार्यकर्ता
चार आण्याचे, आठ आण्याचे आणि बारा आण्याचे कार्यकर्ते अशी वर्गवारी झाल्यामुळे शाखाप्रमुखांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख कार्यसल्लागार (क्रमांक 1) संजयजी राऊत यांनीच शिवसेनेच्या खासदाराला चार आण्याची किंमत नसल्याचे जाहीर केल्याने खळबळ उडाली होती. त्याचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी चिल्लर आणि बंदा रुपया यातील फरक उदाहरणासह स्पष्ट केल्याने गोंधळात भर पडली होती.Sunday, January 8, 2012
शिवसेनेची अग्नीपरीक्षा
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुंबई-पुण्यात काँग्रेस आघाडीबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडवे आव्हान आणि युतीतीलच सहकारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातील गटबाजी आणि दगाबाजीचा फटका शिवसेनेला बसू शकतो. सगळे जुळवून आणल्यानंतरही युतीला अपेक्षित यश मिळाले नाही तर कविता आणि शेरोशायरी करणारे रामदास आठवले यांच्या ताकदीबाबत मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
Subscribe to:
Posts (Atom)

