OPINIONMAKER

Wednesday, January 14, 2009

लेखणीचे सामर्थ्य!


एखाद्या गुंडाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर पत्रकारांनी त्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातम्या व लेख यामुळे तीनच दिवसात त्याने पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगावे लागले. जोखिम स्वीकारुन पत्रकारांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले। त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे। यापुढील काळात अशा घटनांबाबत समाजानेही याबाबत रस्त्यावर येऊन प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. तरच अशा प्रवत्तींना रोखता येईल.


Monday, January 12, 2009

वाल्याचे वाल्मिकी होणार, महाराष्ट्रात रामराज्य येणार...


दादांबद्दल उभ्या महाराष्ट्रात एक आदरयुक्त दबदबा आहे. अत्यंत सडतोड बोलणे, वेगाने कामे मार्गी लावणे आणि प्रशासनावर करडी नजर यामुळे सर्वसामान्य लोकांना दादांचे व्यक्तिमत्त्व आकर्षित करते. चुकीचे काम करणाऱ्याला दादा अजिबात थारा देत नाहीत, अशा व्यक्तींना लगेचच त्यांची जागा दाखवून देतात. सध्याच्या काळात असे नेते दुर्मिळ असल्यानेच दादांबद्दल लोकांना आदर वाटतो. होय, आपले जलसंपदा मंत्री आणि समस्त पुणे शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दलच आम्ही लिहितो आहोत. (खरे तर महाराष्ट्राला "साहेब' म्हटले की यशवंतराव चव्हाणसाहेब आणि "दादा' म्हटले की फक्त वसंतदादा पाटील यांचीच नावे आठवतात. पण काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते स्वतःला "साहेब' आणि "दादा' संबोधू लागल्यामुळे हा खुलासा करणे भाग पडले.)

Sunday, January 11, 2009

बिल्डरांचे गौडबंगाल


सामान्यांना घरे बांधून देण्यापेक्षा जमिनी विकत घेऊन लॅंडबॅंक तयार करायची, आपल्या ताब्यातील जागांवर फक्त पस्तीस आणि चाळीस लाख रुपये किंमतीचेच फ्लॅट बांधायचे ही बिल्डरांची भूमिका म्हणजे इथल्या समाजाशी आम्हांला काही देणे-घेणे नाही अशाच प्रकारची आहे।पाचशे चौरस फुटांचे दहा-बारा लाख रुपये किंमतीचे फ्लॅट, ही पुण्यातील लाखो मध्यमवर्गीयांची गरज आहे। असे असताना केवळ जमिनी आणि फ्लॅटचा साठा करुन ठेवणाऱ्या बिल्डरांवर सरकारने कारवाई करण्याची गरज आहे। कारण, कोणतीही साठेबाजी ही समाजहिताच्या विरोधातच असते.