OPINIONMAKER

Showing posts with label राष्ट्रवादी. Show all posts
Showing posts with label राष्ट्रवादी. Show all posts

Sunday, February 13, 2011

पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी

नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरचित्रवाणी वृ्त्त वाहिन्यांच्या पत्रकारितेबाबत काही विधाने केल्यानंतर  पत्रकारांनी त्यांच्यावर  बहिष्काराचे अस्त्र उपसले. अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार या अस्त्राकडे ढुंकनही पाहिले नाही. आपण काहीच चुकीचे बोललेलो नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ते त्यावर ठाम राहिले.  त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी * अटी लागू अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकर पुढार्‍यांनी तातडीने अजित पवार यांच्यावरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करुन टाकले आणि या प्रकरणातून एक प्रकारे स्वतःची सुटका करुन घेतली.  मूळ मुद्दा आहे तो हे सगळे कशामुळे घडले. सध्याची पत्रकारिता आणि पत्रकारांना नोकरी म्हणून  काय गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि अजित पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते?

Tuesday, March 17, 2009

ताकद राष्ट्रवादीची आणि सुभेदारांची


पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे सहा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबरदस्त ताकद असल्याचे सांगितले जाते. या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था, साखर कारखाने हे सगळे लक्षात घेतले तर पक्षाचे या भागात निर्विवाद वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. या पाच जिल्ह्यातील बारापैकी कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, कऱ्हाड, बारामती, नगर (दक्षिण) येथून मागील वेळी पक्षाचे खासदार निवडून आले होते. त्याखेरीज पंढरपूर (राखीव) मतदारसंघातून पक्षाच्या पाठिंब्यावर रामदास आठवले निवडून आले होते. उर्वरीत चार जागांपैकी दोन कॉंग्रेसला (सांगली व पुणे) आणि प्रत्येकी एक भारतीय जनता पक्षा (सोलापूर) व शिवसेनेला (खेड, जि. पुणे) मिळाली होती.

पंजा, घड्याळ कशाला? कोंबडाही चालेल...

Monday, March 9, 2009

कुणाची माघार, कुणाची सरशी? ( शिरुर लोकसभा मतदारसंघ)



कुणाची माघार तर कुणाचा विजय निश्‍चित अशी स्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातील उमेदवारीमुळे झाली आहे. श्री. पवार यांच्या डावपेचांचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना. या मतदारसंघात आढळराव यांना अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिरुर विधानसभा मतदारसंघात बाबुराव पाचर्णे आमदार आहेत. पाचर्णे मूळचे कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेले पण तिथे आमदरकी मिळण्यात निर्माण झालेले अडथळे पाहून ते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले आणि आमदरकी मिळवली. पवार इथून लोकसभेची निवडणूक लढणार म्हटल्यावर पाचर्णे मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. हडपसरमध्ये कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर एक त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघाची गणना राष्ट्रवाद कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून होऊ शकते. अशा स्थितीत जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहजपणे मिळायला हवी होती. पण राजकारण कधीच इतके सरळ नसते.

आढळरावांचा चमत्कार

Wednesday, January 14, 2009

लेखणीचे सामर्थ्य!


एखाद्या गुंडाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर पत्रकारांनी त्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातम्या व लेख यामुळे तीनच दिवसात त्याने पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगावे लागले. जोखिम स्वीकारुन पत्रकारांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले। त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे। यापुढील काळात अशा घटनांबाबत समाजानेही याबाबत रस्त्यावर येऊन प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. तरच अशा प्रवत्तींना रोखता येईल.


Monday, January 12, 2009

वाल्याचे वाल्मिकी होणार, महाराष्ट्रात रामराज्य येणार...


दादांबद्दल उभ्या महाराष्ट्रात एक आदरयुक्त दबदबा आहे. अत्यंत सडतोड बोलणे, वेगाने कामे मार्गी लावणे आणि प्रशासनावर करडी नजर यामुळे सर्वसामान्य लोकांना दादांचे व्यक्तिमत्त्व आकर्षित करते. चुकीचे काम करणाऱ्याला दादा अजिबात थारा देत नाहीत, अशा व्यक्तींना लगेचच त्यांची जागा दाखवून देतात. सध्याच्या काळात असे नेते दुर्मिळ असल्यानेच दादांबद्दल लोकांना आदर वाटतो. होय, आपले जलसंपदा मंत्री आणि समस्त पुणे शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दलच आम्ही लिहितो आहोत. (खरे तर महाराष्ट्राला "साहेब' म्हटले की यशवंतराव चव्हाणसाहेब आणि "दादा' म्हटले की फक्त वसंतदादा पाटील यांचीच नावे आठवतात. पण काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते स्वतःला "साहेब' आणि "दादा' संबोधू लागल्यामुळे हा खुलासा करणे भाग पडले.)