अमेरिकेबरोबरील अणुकराराच्या मुद्यावरुन डाव्या पक्षांनी मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकारला संसदेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले। त्यावेळी भाजप व त्या पक्षाच्या हितचिंतकांनी आता सरकार पडलेच असे वातावरण तयार केले होते. केंद्रातील सरकार पडले तर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होतील, अशा पुड्या सोडून देण्यास सुरवात झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या स्थिताबाबत केलेले लिखाण...
Don't let the sadness of your past and the fear of your future, run the happiness of your present.
Showing posts with label कॉंग्रेस. Show all posts
Showing posts with label कॉंग्रेस. Show all posts
Sunday, July 20, 2008
Monday, January 7, 2008
कॉंग्रेसला बदलावेच लागेल

मतदार आता केवळ विकासकामांवर समाधानी दिसत नाही. पक्षाची भूमिका, जाहीरनामा याबरोबरच आपली अस्मिता जोपासणारा, स्वाभिमानाला खतपाणी घालणारा एक "चेहरा' त्याला हवा असतो. स्वतःला ज्याच्याशी जोडता येईल, अशा नेत्याच्या शोधात तो असतो. म्हणूनच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अगोदर जाहीर करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी कॉंग्रेसला त्यांच्या "दरबारी' कार्यपद्धतीत बदल करावा लागेल.
Subscribe to:
Posts (Atom)