OPINIONMAKER

Wednesday, January 26, 2011

हौतात्म्य


सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकातील जनतेच्या हिताचे रक्षण करताना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या लढ्यातील. आता त्या  पंक्तीत  सोनवणे यांनी  स्थान मिळवले आहे. आमच निर्ढावलेलेल राजकारणी अशा किती जणांना हौतात्म्य पत्करायला लावणार आहेत, माहिती  नाही.
-------------------------------------

  एकीकडे 'आदर्श' गैरव्यवहार करणारे नेते आणि आयएएस अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत. सुभाष लाला आणि रामानंद  तिवारी यांच्या सारखे निगरगट्ट अधिकारी तर बेडरपणे समाजाचा पैसा लुटून राजीनामा द्यायला नकार देण्याची हिंमत दाखवू शकतात आणि दुसरीकडे सोनवणेंसारख्या प्रामाणिक अधिकार्‍याला
आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे.

माणूस श्रेष्ठ


आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्‍न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्‍वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्‍न आहे.
----
गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्‍न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?