OPINIONMAKER

Wednesday, January 26, 2011

हौतात्म्य


सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकातील जनतेच्या हिताचे रक्षण करताना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या लढ्यातील. आता त्या  पंक्तीत  सोनवणे यांनी  स्थान मिळवले आहे. आमच निर्ढावलेलेल राजकारणी अशा किती जणांना हौतात्म्य पत्करायला लावणार आहेत, माहिती  नाही.
-------------------------------------

  एकीकडे 'आदर्श' गैरव्यवहार करणारे नेते आणि आयएएस अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत. सुभाष लाला आणि रामानंद  तिवारी यांच्या सारखे निगरगट्ट अधिकारी तर बेडरपणे समाजाचा पैसा लुटून राजीनामा द्यायला नकार देण्याची हिंमत दाखवू शकतात आणि दुसरीकडे सोनवणेंसारख्या प्रामाणिक अधिकार्‍याला
आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे.


मुळात गुन्हा केल्यास आपल्याला शिक्षा होईल, तुरुंगात जावे लागेल, अशी भीती भ्रष्ट अधिकारी,, नेते,  गुंड,  माफिया यांना वाटत नाही. हा आपल्या कायदा आणि न्याय व्यवस्थेतील मोठा दोष म्हणावा लागेल. कायदा
आणि न्याय व्यवस्थेची भीती गुंडपुंडांना वाटण्याऐवजी सामान्य माणसाला वाटते. अन्याय झाला
तरी पोलिस चौकीत जायला तो भितो. कारण समोरच्या गुंडाऐवजी आपल्याच अडकवले जाण्याची
भीती त्याला जास्त वाटत असते. कारण गुंड, नेते, माफिया हे पोलिसांवर दबाव आणून किंवा
त्यांना पैसे चारुन सहीसलामत सुटणार व आपण विनाकारण अडकणार अशी सामान्य नागरिकांची
पक्की समजूत झालेली आहे. किंबहुना असेच होणार, असे त्याला वाटत असते आणि तसे घडल्याचे
अनेकदा त्याने पाहिलेले असते. अन्यायाविरुद्ध धाडसाने तक्रार नोंदवा, अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो, अशी सुभाषिते वाचायला बरी वाटत असली तरी प्रत्यक्षात वेळे येते तेव्हा तुमचा हकनाक बळी जातो हे शंभर टक्के ठरलेले. अन्यथा सोनवणे यांना जाळणारा तडीपार गुंड काही निधड्या छातीने भेसळीचे काम खचितच करत नव्हता. त्याला भक्कम राजकीय पाठबळ असल्याशिवाय तो असे करणे शक्यच नव्हते. स्विर्त्झलंडमधील बँकांमध्ये कोट्यावधी रुपये ठेवणार्‍यांची नावे कदाचित समजतील पण या गुंडाला पाठिशी घालणार्‍या नेत्यांची नावे कधीच कळणार नाहीत. कारण पेट्रोल भेसळ, जमिनींची खरेदी-विक्री, बिल्डर, टोलवसुलीवाले, मटक्याचे अड्डे चालवणारे, हातभट्ट्या चालवणार्‍यांच्या मागे राजकीय नेते अदृश्य रुपात असतात. आता तर बहुतेक नेत्यांचे बिल्डरांशी साटेलोटे असल्याचे दिसते. मग  कुणीही बिल्डर उठतो, पत्रकाराला घरी बोलवतो आणि बेदम मारहाण करतो, हे कशाच्या जीवावर? त्याला राजकीय पाठबळ असते म्हणूनच. पत्रकाराला नाही आपल्या वाटेत येणार्‍या कुणालाही झोपवले तरी या जन्मात आपल्यालावर कोणतीही ठोस कारवाई होणार नाही, याचा त्यांना विश्वास असतो म्हणूनच हे गुंडपुंड, माफिया आणि बिल्डर असे प्रकार करायला धजावतात. पेट्रोलमध्ये भेसळ करणार्‍या माफियांना विरोध केला म्हणून सोनवणे यांना  प्राण गमावावे लागले. परंतु आज आपल्याभोवती जमिनींचे व्यवहार करणारे माफिया, दूधात आणि अन्नधान्यात भेसळ करणारे, कोणतीही पारदर्शकता न ठेवता टोल वसुली करणारे आणि कुठल्याही शासकीय कामासाठी पावलापावलावर सामान्य जनतेकडून पैशाची मागणी करणारे असे अनेक माफिया वावरत आहेत. अर्थात यांनी जमा केलेल्या पैशात राजकारण्यांचा वाटा असतोच. तुम्ही आम्ही घाम गाळून कष्टाने निर्माण केलेल्या या संपत्तीचे या माफियांकडून शोषण केले जाते आणि हाच पैसा राजकीय नेत्यांच्या माध्यमातून स्विर्त्झलंडमधील बँकात जातो. बेकायदेशीर धंदे करणार्‍यांच्या जीवावर जगणारे राजकीय नेते-कार्यकर्ते म्हणजे सभ्य समाजातील ऐतखाऊ गुंड आहेत. सामान्य जनतेला प्रत्येक पावलावर नडून टोलवसुली करणे हाच त्यांचा धंदा असतो. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना एवढेच नव्हे तर संस्कृतीरक्षक आणि प्रखर देशभक्तांचा भरणा असलेला भारतीय जनता पक्षही या माफियांच्या तावडीतून सुटू शकलेला नाही. स्थानिक राजकारणात पाच-सहा खून पचवलेले  माफिया प्रत्येक पक्षात आहेतच. अगदीच न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर किंवा शिक्षा केल्यावर त्यांना पक्षातून काढण्याची नाममात्र कारवाई या पक्षांना नाईलाजाने करावी लागते. त्यामुळे या देशाला अतिरेक्यांपेक्षाही जास्त धोका आहे तो या माफियांचा. कारण भेसळीमुळे अप्रत्यक्षरित्या देशाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. भेसळयुक्त दुधामुळे तर आपल्याला आणि मुलांना कोणत्या विकारांना सामोरे जावे लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही. यावर प्रभावी उपाय म्हणजे शंभर टक्के मतदान आणि .जो मतदान करत नाही तो कसाबपेक्षाही भयंकर अतिरेकी आहे, असे समजणे.

-सुहास यादव

Please read related article `Our Hero' 

3 comments:

Prasad Jog said...

Suhasji, I went to see 'no one killed Jessica' yesterday evening. In the movie, the investigating P.I. openly admits taking bribe from the father of the killer for not beating him. None the less, he is thorough with his investigation! He has tape recorded the confession of the accused, he has lined up all witnesses properly and also has gathered proper evidence. If all officers behaved in this manner, Indian society will be much better! Today, people do not mind paying bribe for getting a legitimate work done. It is very bad and sad, but true. On the other hand, the Babus know what is right and what is wrong but takes money for both. There is a lot of hue and cry today that an honest officer is murdered. But someone needs to advise these Babus on strike today, that if they look only at the money being offered to them and neglect their real role as a custodian of the nation's property, some day, some other Popat will kill them as well even for demanding a raise in 'Hapta'. The politicians always want babus who collect and will allow/neglect illegal activities of their cronies. If the Babus refused to accept illegal activities, they will be singled out and tortured, as per the common knowledge. But you can not target 30-40 percent of employees. Today, unfortunately, those who refuse to do illegal things are in a sad minority and hence the politicians can ride on them.
I am afraid the investigation will blame late Mr.Sonawane for going to the spot without proper protection!

Arvind Dorwat said...

आमच्यासारख्या ५०% लोकांमुळे (जे मतदान करत नाहीत) अशी भिकमागी कुत्री निवडून येतात. निवडणुका नि:पक्षपाती होतच नाहीत. पैसे लागतातच, म्हणून भ्रष्टाचार सर्व पातळ्यांवर करावा लागतो (च). काय करणार! नाईलाज आहे. लोकशाही टिकवायची आहे ना! - arvind dorwat

Unknown said...

aapan fakt ashya lokanchya virodhaat vichaar karu shakto ..pan pudhe janyaas tayar nahi karan aapan ch aapla praan gamavnaar aani aaplya gharchyanna ughadyavar aannaar..hya mule samanya janta kadhich samor jayla dhajavat nahi..tumche vakya awadle "ki gunha karnarya peksha sahankarnara jast apradhi asto" he vakya aikayla tevdhe chaan vatte ...pan haknaak bali kon janaar ho..swatache balidaan deyla kunich tayar naste...je tumche mat aahe tech maaze pan aahe ...dhanyavaad