Don't let the sadness of your past and the fear of your future, run the happiness of your present.
Tuesday, June 7, 2011
भक्तगण संकटात, बाबा स्त्रीवेशात...
Saturday, May 21, 2011
ढोंगीपणा आणि परिवर्तनाचा भाबडा आशावाद


ममता बॅनर्जी यांच्या इतकी धडाडी, जनतेच्या प्रश्नांवर मोठी आंदोलने उभी करुन आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहाण्याची ताकद, प्रलोभनांना बळी न पडता लढत राहण्याची तयारी महाराष्ट्रातील कोणत्या विरोधी नेत्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भारतीय जनता पक्ष विविध महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर तडजोडी करुन त्याला तत्वाचा मुलामा देत असतात. कधीमधी पक्षासाठी नव्हे तर आपल्या वैयक्तिक संस्थांना मदत, अनुदान, परवानगी मिळावी म्हणून तर कधी आपल्या संस्थेची चौकशी होऊ नये, लांबणीवर पडावी म्हणून विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते सत्तेत असलेल्या नेत्यांशी सलगी करत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी जनतेसमोर असा पर्याय असेल तर शिवसेनाप्रमुखांचा आशावाद भाबडा ठरण्याची शक्यता जास्त आहे.
Saturday, April 23, 2011
कोई पत्थरसे ना मारो.......
जनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीचे सदस्य संतोष हेगडे सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय घेणार आहेत. हेगडे काय किंवा भूषण पितापुत्र आणि अण्णा हजारे काय, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार्या या बिनीच्या शिलेदारांबद्दल कुणीची काही बोलायचे नाही, असा बहुधा त्यांचा दंडक आहे. आम्ही धुतल्या तांदाळासारखे स्वच्छ आणि बाकी सगळे भ्रष्ट असा बहुतेक या मंडळींचा समज झालेला दिसतो.Monday, March 28, 2011
ज्योतिषांचा सायकॉलॉजिकल गेम...
ज्योतिषी नेहमी सायकॉलॉजिकल गेम खेळत असतात. समोरच्याला या गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो बेसवाध असतो. त्यामुळेच या गेममध्ये विजय नेहमी ज्योतिषांचा होतो. मात्र, पुण्यातील एक ज्योतिषी मोठी शेखी मारायला गेले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकित केले. आता पुण्यातील ज्योतिषाने सांगितल्यावर भारताचा पराभव अटळ होता. परंतु युवराजसिंग आणि रैना यांना हे मान्य नव्हते. हे कसे काय घडले....
Sunday, March 27, 2011
संधी नावाचा साधू

सौजन्य ः http://archives.digitaltoday.in
------------------------------------------
संधी नावाचा साधू
हिंदुत्वाचा चेहरा असे किती साजिरा
नितीन म्हणतो बघ आहे किती गोल गोजिरा
पण लाल म्हणतो 'जिना' मजला प्रिय भारी
मग जसवंत ओढतसे सूर तोच भरजारी
उमा म्हणते उदार हा अटल दिसतो जरा
तोच आमुचा मुखवटा आहे खरा
मज वाटे किती ही गम्मत न्यारी
हिंदुत्व हे आपुले लई लई भारी
मग लाविला मुखवटा यांनी रामाचा मंदिरी
फसली भारतीय जनता भोळी बिचारी
पण आमुचा अरुण तो फार विचारी
सांगतसे गुप्तपणे गम्मत खरीखुरी
म्हणतो कसा आमुचे हिंदुत्व संधीसाधू
पण आता या रॉबर्ट ब्लेकला कैसे शोधू
हिंदुत्व ही तर आमुची जीवनशैली
विकिलिक्सने तिला ठरवली बदफैली
या लिक्सवर घाला लवकर बंदी
साधलेली आहे आपण आपली संधी
-सुहास यादव
-------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)
