Don't let the sadness of your past and the fear of your future, run the happiness of your present.
Sunday, February 13, 2011
पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी
Wednesday, January 26, 2011
हौतात्म्य
सार्वभौम भारतीय प्रजासत्ताकातील जनतेच्या हिताचे रक्षण करताना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या लढ्यातील. आता त्या पंक्तीत सोनवणे यांनी स्थान मिळवले आहे. आमच निर्ढावलेलेल राजकारणी अशा किती जणांना हौतात्म्य पत्करायला लावणार आहेत, माहिती नाही.-------------------------------------
एकीकडे 'आदर्श' गैरव्यवहार करणारे नेते आणि आयएएस अधिकारी उजळ माथ्याने फिरत आहेत. सुभाष लाला आणि रामानंद तिवारी यांच्या सारखे निगरगट्ट अधिकारी तर बेडरपणे समाजाचा पैसा लुटून राजीनामा द्यायला नकार देण्याची हिंमत दाखवू शकतात आणि दुसरीकडे सोनवणेंसारख्या प्रामाणिक अधिकार्याला
आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय चीड आणणारी बाब आहे.
माणूस श्रेष्ठ

आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्न आहे.
----गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?
Sunday, February 28, 2010
अनमोल ठेवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांमुळे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे नाव घराघरात पोचले. त्यांनी नेत्यांपासून उद्योजकांपर्यंत अनेकांचे पुतळे बनवले. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या अनेक सामान्य व्यक्तींची, प्राण्यांची शिल्पे बनवली. कलेला त्यांनी सामान्य माणसाशी जोडले. अशा श्रेष्ठ शिल्पकाराच्या कलाकृती त्यांच्या सासवण्यातील संग्रहालयात पहायला मिळतात. अलीबागजवळी छोट्या खेड्यात असलेले हे संग्रहालय आवर्जून पहावे असेच आहे.
--------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे नाव घराघरात पोचले. पुतळ्यांखेरीज त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक सामान्य व्यक्तींची शिल्पे बनवून समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ज्यांची त्यांनी शिल्पे बनवली, त्यापैकी अनेकजण आता हयात नाहीत. तरीही ही शिल्पे पाहिल्यानंतर यांना आपण कुठेतरी पाहिले आहे, आपली त्यांच्याशी पूर्वीची ओळख आहे, असे वाटू लागते. कदाचित पुढच्याच क्षणी एखादे शिल्प आपल्याशी बोलू लागेल, असे वाटण्याइतकी ती जिवंत आहेत. करमरकरांच्या सासवण्यातील घरात असा अनुभव पावलापावलावर, प्रत्येक शिल्पापाशी येतो.
Monday, November 23, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
